Friday, February 8, 2008

अभयारण्य

सर्जनशीलता, लायकी आणि मार्केटिंग......

आम्ही कॊलेजला एका वसतिग्रुहात शिकलो तेव्हा आमचा एक कविमनाचा मित्र होता...
लायक माणसांना कौतुक लाभायच्या ऐवजी नेहमीच कोणा भलत्यालाच (त्याच्या अंगभूत गुणांच्याऐवजी काही इतर कारणांमुळे..उदा. सत्ता , पैसा, उच्च वर्तुळात संपर्क इ.) कौतुक लाभते असे जेव्हा दिसत असे, त्यावेळी आमच्या या मित्रास भयंकर वैफ़ल्य येत असे...हे वैफ़ल्य कधी वाजवी आणि कधी अत्यंत अयोग्य असे, पण त्याच्याशी फ़ार वेळ वाद घालणे शक्य होत नसे.... " श्रीमंत माणसे लायकी नसताना पैशांच्या जोरावर काहीही मिळवू शकतात" असे तो म्हणे, आणि चिडचिड करे....
.........मी गेल्या वर्षी एक दीर्घांक लिहिला आणि त्याचे पुण्यात काही प्रयोगही झाले...नाटकाचा मूळ विषय वेगळा असला तरी त्यातला एक संवाद माझ्या आणि माझ्या मित्राच्या त्यावेळच्या वाक्युद्धावर (?) बेतलेला होता...
धीरज, चिन्मय हे दोघे २२ वर्षे वयाचे, शाळेपासूनचे मित्र,....धीरज अभ्यासात हुशार, श्रीमंत घरातला, वडील मोठे पोलीस ऒफ़िसर,इन्जिनियर झाल्यावर परदेशी जाऊन शिक्षण घेऊ इच्छिणारा
चिन्मय : पदवीनंतर मुंबईत जाऊन स्ट्रगल करणारा अभिनेता, आणि अर्थात अपेक्षाभंगामुळे वैफ़ल्यग्रस्त....
मोन्या : या दोघांचा एक कोमन मित्र, श्रीमंत..... वडिलांचा व्यवसाय सांभाळत हौशी नाटके, स्पर्धा वगैरे करणारा...त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीहून दोघे धीरज च्या घरी परत आले आहेत...
..............